16 ते 19 जुलै होणार ऑनलाईन परीक्षा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2025
- 227
नवी मुंबई ः ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती 2025’ अंतर्गत गट - क आणि गट - ड यामधील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84,774 अर्ज प्राप्त झालेले असून या पदांकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.16, 17, 18 आणि 19 जुलै 2025 या दिवशी घेण्यात येणार आहेत. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे यादृष्टीने 11 जिल्ह्यांमध्ये 28 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे.
परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षा प्रवेश पत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती - 2025 अंतर्गत घ्यावयाच्या ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय वेळापत्रक नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. सदर पदभरतीच्या परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्याचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे.
नवी मुंबई महापालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत आहे. भरतीविषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी पालिकेचे संकेतस्थळ तसेच अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai