शिंदेसेनेचा मार्गदर्शन मेळावा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 19, 2025
- 110
नवी मुंबई ःनवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सोमवारी शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि युवासेना यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी कशी करायची, प्रभागनिहाय निवडणूक पद्धती कशी आखायची आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत झालेली विकासकामांची माहिती प्रत्येक घराघरात कशाप्रकारे पोहोचवायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, संघटिका सरोज पाटील आणि शहर प्रमुख विजय माने यांनी मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश मोठ्या प्रमाणात दिसून आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. यावेळी उत्तर भारतीय सेल प्रमुख शशी यादव व इतर मान्यवर पदाधिकारी आणि प्रभागनिहाय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai