16 दुर्गांच्या प्रतिकृतींची निवड अंतिम फेरीत
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 31
शालेय गटातून 8 व खुल्या गटातून 8 समुहांची निवड
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘दुर्गोत्सव’ उपक्रमामध्ये नवी मुंबईतून जास्तीत जास्त सहभाग असावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या ‘दुर्गबांधणी स्पर्धे’ला अत्यंत उत्तम प्रतिसाद लाभला. शालेय व खुला दोन्ही गटातून 56 प्रवेश अर्ज आले होते. यामधून 16 स्पर्धकांच्या दुर्गांच्या प्रतिकृतींची निवड अंतिम फेरीत करण्यात आलीआहे. विशेष म्हणजे या दुर्गबांधणी करणाऱ्या समुहांनी शासनाच्या दुर्गोत्सवात सहभागी होऊन मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे डिजीटल प्रशस्तिपत्र प्राप्त करून घेतले आहे.
दुर्गबांधणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या समुहांतून शालेय गटातून 8 व खुल्या गटातून 8 अशाप्रकारे एकूण 16 दुर्गांच्या प्रतिकृतींची निवड प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत करण्यात आलेली आहे. सुप्रसिध्द कलादिग्दर्शक तथा चर्नीरोड मुंबई येथील स्कुल ऑफ आर्ट महाविद्यालयाचे कला प्राध्यापक शिवम घोडजकर यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले आहे. त्यामधून शालेय गटात रयत शिक्षण संस्थेचे मॉडर्न स्कुल वाशी, नमुंमपा सेकंडरी स्कुल घणसोली, नमुंमपा शाळा क्र. 71 इंदिरानगर, आयईएस नवी मुंबई हायस्कुल वाशी, ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक शाळा करावे, विवेकानंद संकुल हायस्कुल सानपाडा, आयसीएल हायस्कुल वाशी, नमुंमपा शाळा क्र. 103 ऐरोली या 8 शाळांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे सोसायट्या, वसाहती, संस्था यांच्या खुल्या गटातून श्लोक शिंदे व शिवांश शिंदे ऐरोली, शंकरकृपा मित्र मंडळ ऐरोली, अष्टविनायक सोसायटी वाशी, एकविरा ग्रुप दिघा, राजांची छोटी प्रजा ऐरोली, ट्विन्स हॉलमार्क सहकारी गृहसंस्था कोपरखैरणे, सत्यम असोसिएशन बेलापूर, सिंहसेना सानपाडा या आठ दुर्ग प्रतिकृती बनविणाऱ्या समुहांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत 56 सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करीत प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या 16 स्पर्धकांच्या दुर्ग प्रतिकृतींची 2 दिवसात अंतिम फेरीसाठी पाहणी करण्यात येऊन त्यामधील प्रत्येक गटात 6 अशा 12 स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai