44 लाखांचा तांदूळ जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2025
- 121
पनवेल ः पनवेल सार्वजनिक वितरण प्रणालीतील फोर्टीफाईड तांदूळ (पीडीएस) विनापरवानगी खुल्या बाजारात विक्रीस काढल्याप्रकरणी पनवेलच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 44 लाखांहून अधिक किमतीचा तांदूळ आणि 70 लाख रूपये किमतीची पाच वाहने जप्त केली आहेत. तीन कंपन्यांच्या माध्यमातून हा तांदूळ गैरमार्गाने बाजारात विक्रीला आणला जात असल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.
पनवेलच्या पुरवठा अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी (ता. 1) दुपारी दिड वाजता तालुक्यातील कसळखंड येथील आष्टे लॉजिस्टिक्स समोरील ट्रकच्या वाहनतळामध्ये धाव घेतली. या वाहनतळामध्ये संशयास्पद पाच ट्रक उभे होते. पोलिसांच्या मदतीने या ट्रकमधील मालाची कागदपत्रांची मागणी केली. या तपास मोहीमेमध्ये ट्रकमधील पोत्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी असलेला 1600 क्विंटल फोर्टीफाईड तांदूळ आढळला. 25 किलोग्रॅम वजनाच्या 6,400 पोत्या तपस पथकाला आढळल्या. मालासोबतच्या पावत्या आणि मालाची पाहणी केल्यावर संपूर्ण मालसाठ्याची किंमत 44 लाख 21 हजार 416 इतकी असल्याचे स्पष्ट झाले. तर पाचही वाहनांची एकत्रित किंमत 70 लाख एवढी होती.
हा तांदूळ कोल्हापूर येथील वेस्टर्न राईस मील, कर्नाटक येथील पी.के. मलगी ॲग्रोटेक आणि श्री बनशंकरी ॲग्रो प्रोसेसींग लीमीटेड या कंपन्यांकडून विनापरवानगी खुल्या बाजारात विकला जात असल्याचे पुरवठा विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले. सदर प्रकरणात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai