पालिका रुग्णालयात एमआरआय सुविधा
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2026
- 29
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या दृष्टीने वाशी व ऐरोली येथील पालिका रुग्णालयात अत्याधुनिक तांत्रिक सेवा सुविधांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी रुग्णालयात एमआरआय तपासणी सुविधा सुरू होणार आहे. तर ऐरोली येथील रुग्णालयात कॅथलॅब सुविधा येत्या 6 महिन्यांत सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
महापालिकेतर्फे रुग्णालयांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाशी रुग्णालयात एमआरआय केंद्रासोबतच 3 टेस्ला क्षमतेचे प्रगत एमआरआय मशीन बसविण्यात येत आहे. यामुळे मेंदू, मणका, सांधे व इतर अंतर्गत अवयवांचे अत्यंत स्पष्ट व अचूक निदान शक्य होणार आहे. हे एमआरआय सेंटर चालवण्यासाठी 33 कोटी 18 लाखांच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. हे कंत्राट मे. रुबी अलिकेएर सर्व्हिसेस प्रा. लि. यांना देण्यात आले आहे. 10 वर्षांसाठी एमआरआय प्रणाली चालवण्याचा करार करण्यात आला आहे. कामाच्या गुणवत्तेची तपासणी केल्यानंतर दरवर्षी कराराचे नूतनीकरण केले जाईल. याशिवाय, हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांवरील उपचारांसाठी वाशी रुग्णालयात बाय-प्लेन कॅथलॅब उभारण्यात येत आहे. त्यासाठी 46 कोटी 46 लाख रुपयांच्या खर्चाच मान्यता मिळाली आहे.
ऐरोली येथे सिंगल प्लेन कॅथलॅबची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी 14 कोटी 95 लाख रुपयांच्या कामास मंजुरी मिळाली आहे. हे कंत्राट मे. पिनॅकल बायमेड यांना देण्यात आले आहे. या सेवांमुळे नवी मुंबई पालिका रुग्णालयात कमी खर्चात एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एमआरआय मशीनसाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 10 मेच्या आधी ही सुविधा सुरू करून नागरिकांना याचा लाभ घेता यावा म्हणून महापालिकेच्या हालचाली सुरू आहेत. - डॉ. अजय गडदे, वैद्यकीय अधिकारी, नमुंमपा
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai