‘स्व-गणना’ उपक्रमाची महापौरांच्या हस्ते सुरुवात
- by Aajchi Navi Mumbai
- May 08, 2026
- 20
पनवेल ः महानगरपालिका मुख्यालयात आज भारत सरकारच्या आगामी जनगणना 2027 अंतर्गत ‘स्व-गणना’ उपक्रमाचा शुभारंभ महापौर नितीन पाटील तसेच लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महापौर आणि उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः ऑनलाईन माध्यमातून ‘स्व-गणना’ पूर्ण करून नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला. या उपक्रमाद्वारे नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. महापौरांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “जनगणना ही देशाच्या विकास आराखड्याचा पाया असून प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. ‘स्व-गणना’मुळे प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेची बचत करणारी ठरणार आहे.
स्व गणना 01 मे ते 15 मे दरम्यान होणार आहे. यासाठी भारत सरकारने मोबाईल ॲप तसेच वेबलिंक च्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती नागरिकांनी अचूक आणि वेळेत भरावी. ही प्रक्रिया अतिशय सोपी, सुरक्षित आणि पूर्णतः ऑनलाइन आहे.पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे व प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी ‘स्व-गणना’ उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या या महत्त्वपूर्ण जनगणनेच्या कार्यात योगदान द्यावे. स्व-गणना केल्यामुळे वेळेची तर बचत होणारच आहे तसेच अचूक माहितीही नोंदवता येणार आहे. यामुळे प्रशासनाचे काम सुलभ होणार आहे. पनवेल महानगरपालिका प्रशासन जनगणना 2027 यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सज्ज असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावी होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai