प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 18
पनवेल ः महापालिकेच्या वतीने खारघर सेक्टर-14 येथील हिंदू स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण तसेच प्राणी अंत्यसंस्कार केंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन समारंभ , नुकताच संपन्न झाला.
पर्यावरणपूरक शवदाहीनी व प्राणी अंत्यसंस्कार केंद्र अशा पर्यावरणपूरक कामांसाठी आ.प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे अभिनंदन करत महापालिकेची पर्यावरण विषयक कटिबद्धता अशा कृती मधून दिसून येत असल्याचे म्हटले. पर्यावरणाचा वारसा भावी पिढ्यांसाठी जतन व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर होत आहे, त्यादृष्टीने महापालिका पाऊले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर नितीन पाटील म्हणाले पनवेल आंतरराष्ट्रीय शहर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून त्यादृष्टीने पर्यावरण पूरक गोष्टींचे महत्त्व वाढत आहे. सर्व नागरिकांना पर्यावरण्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करताना, नागरिकांचे सहकार्य व सूचना महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, या अत्याधुनिक पर्यावरणपूरक शववाहिनीमुळे आवश्यकतेच्या 25 टक्के लाकडांमध्ये अंत्य संस्कार करणे शक्य होणार आहे तसेच घातक वायूंना अटकाव करता येणार आहे. विविध उपक्रमांद्वारे पनवेल महानगरपालिका पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी पर्यावरणपूरक शवदाहीनीचे महत्व सांगितले. धार्मिक भावना अबाधित ठेवून या शवदाहिनीच्या माध्यमातून अंत्य संस्कार केले जाणार असल्याचे म्हटले.
प्राण्यांच्या शवदाहिनीची प्रमुख वैशिष्ट्ये / फायदे
- वैज्ञानिक व सन्मानपूर्वक विल्हेवाट मृत प्राण्यांच्या सुरक्षित व नियमानुसार विल्हेवाटीची सुविधा.
- सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण दुर्गंधी, संसर्ग व रोगराईचा धोका कमी होतो.
- पर्यावरणपूरक व्यवस्था धूर, प्रदूषण व पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी होतात.
- मोठ्या व लहान प्राण्यांसाठी स्वतंत्र सुविधा विविध क्षमतेच्या आधुनिक शवदाहिनीची उपलब्धता.
- स्वच्छ शहरासाठी उपयुक्त रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत.
- जलद व कार्यक्षम सेवा मृत प्राण्यांची त्वरित विल्हेवाट लावून नागरिकांची गैरसोय टळते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai