99 टक्के मतदार पुन्हा प्रारुप यादीत
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 11
सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम
मुंबई : देशात सीजेपी व विरोधकांनी एसआयआर प्रक्रियेविरोधात केलेल्या आंदोलनाचे सक्रिय परिणाम देशभरात उमटू लागले आहेत. राज्यात सुरु असलेल्या विशेष मतदारपडताळणी मोहिमेसाठी (एसआयआर) साठी नोटीस बजावण्यात आलेल्या 1 कोटी 22 लाख 24 हजार 7 मतदारांपैकी तब्बल 99.94 टक्के म्हणजेच साधारण 1 कोटी 22 लाख 16 हजार 665 मतदारांचे नाव प्रारुप मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या मतदारांनी नोटीशीला अद्याप उत्तर दिलेले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत.
देशात 13 कोटी मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीतून वगळण्यात आल्याने मोठे आंदोलन सीजेपी व नंतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधकांनी केल्याने त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. या आंदोलनानंतर केंद्रिय निवडणुक आयोगाने अनेक बदल एसआयआरमध्ये केल्याने एसआयआरअंतर्गत वगळलेल्या मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत पुन्हा नोंदवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. राज्यात नंदुरबार, गडचिरोली, ठाणे, नाशिक, मुंबई शहर आणि उपनगर, चंद्रपूर, सातारा, सोलापूर, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये 99 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी नोटीशीला उत्तर देऊन समाधानकारक कागदपत्र सादर केल्याने बहुतांश जणांचे प्रारुप मतदार यादीतील नाव कायम राहणार आहे. ‘प्रारुप मतदार यादीतील तार्किक विसंगतीमुळे आक्षेप असलेल्यांपैकी 99.57 टक्के तर 2002 -2004 च्या मतदार यादीसोबत जुळवणी होत नसल्याचा आक्षेप असलेल्या 99.50 टक्के मतदारांविषयीचे आक्षेप निकाली निघाले आहेत. राज्यात सुरु असलेल्या विशेष मतदारपडताळणी मोहिमेसाठी (एसआयआर) प्रारुप मतदार यादीत समाविष्ट असलेल्या 1 कोटी 22 लाख 24 हजार 7 मतदारांना आयोगाकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये 2002-2004 च्या मतदार यादीत जुळवणी झालेले पण विसंगती आढळलेल्या आणि जुळवणी न झालेल्या मतदारांचा समावेश होता. नोटीस बजावण्यात येणाऱ्या मतदारांना पुन्हा ओळख कागदपत्रे सादर करावी लागली होती.
राज्यात नावात, छायाचित्रात विसंगती असलेल्या 99.57 टक्के, जुन्या मतदार यादी तसेच पालकांसोबत जुळवणी होत नसल्याने 99.50 टक्के तर अन्य कारणामुळे नोटीस बजावण्यात आलेल्यांपैकी 99.99 टक्के मतदारांनी आपली कागदपत्रे निवडणूक आयोगाला सादर केल्यामुळे त्यांची 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रारूप यादीतील 7 कोटी 71 लाख मतदारांपैकी केवळ 47 हजार 247 मतदारांच्या कागदपत्रांची छाननी अद्याप झाली नाही किंवा त्यांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत. पुढील काही दिवसांत यातील बहुतांशी मतदारांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण होण्याची शक्यता निवडणूक आयोगाकडून वर्तविण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai