निर्माल्यापासून खतनिर्मिती उपक्रम यशस्वी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 19
तयार खताचा वृक्षसंवर्धनासाठी वापर सुरू
नवी मुंबई : गणेशोत्सवात विसर्जन स्थळांवर जमा होणाऱ्या निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावत त्यापासून खतनिर्मिती करण्याचा डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम यशस्वी झाला आहे. प्रतिष्ठानच्या नवी मुंबईतील श्री सदस्यांनी शहरातील सात विसर्जन स्थळांवर निर्माल्याचे संकलन व वर्गीकरण करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले आहे. या खताचा वापर 22 नोव्हेंबरपासून महापे येथील हनुमाननगर परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांसाठी सुरू करण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात दिवाळे जेट्टी, बेलापूर गाव तलाव, नेरूळ गाव तलाव, चिंचोली तलाव (शिरवणे-जुईनगर), कोपरखैरणे सेक्टर 19 धारण तलाव, ऐरोली खाडी तलाव आणि महापे तलाव या सात ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले. त्यानंतर ओले आणि सुके निर्माल्य वेगळे करून ओल्या निर्माल्यातील फुलांच्या पाकळ्या स्वतंत्र करण्यात आल्या. या पाकळ्यांपासून कोपरखैरणे धारण तलावाजवळील उद्यान आणि ऐरोली सेक्टर 19 मधील मोकळ्या भूखंडाजवळील उद्यानात तयार केलेल्या कंपोस्ट पीटमध्ये खतनिर्मिती करण्यात आली.
महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. निर्माल्याचे कचऱ्यात रूपांतर होण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करून वृक्षसंवर्धनासाठी उपयोग करण्याचा हा पर्यावरणपूरक प्रयत्न आहे. नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ नवी मुंबई मिशन आणि स्वच्छ भारत अभियानालाही या लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे बळ मिळाले आहे. पुढील वर्षीही गणेशोत्सवात निर्माल्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai