पनवेलमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 19
पनवेल ः शहरात अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू असताना हिवाळ्यासोबत पनवेलकरांना सोमवारपासून आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंदचा सामना करावा लागणार आहे. शहरातील जलकुंभनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याच्या नियोजनाची अंमलबजावणी पनवेल महापालिकेने सोमवारपासून सुरू केली आहे. दिवाळीपूर्वीच या नियोजनाची अंमलबजावणी सुरू होणार होती. परंतू काही लोकप्रतिनिधींनी दिवाळी सणानंतर याची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. अखेर सोमवारपासून पनवेल शहरात विविध जलकुंभनिहाय आठवडाभरातील एक दिवस पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले.
आठवड्यातील रविवार वगळता इतर दिवसांसाठी हे नियोजन आखण्यात आले आहे. रविवारी शहरातील सर्व भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याने;पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा मर्यादित झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलकुंभनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. याबाबत शासनाने 9 ऑक्टोबरला काढलेल्या निर्णयानूसार धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करण्याची सूचना केली होती. त्यानूसार शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या जलकुंभांमधून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
सानपाड्यात ऑइल कंपनीला भीषण आग मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूस गोदाम आगीच्या विळख्यात; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला, अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणी वितरणाच्या वेळेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येऊ शकतो, असे पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवसनिहाय जलकुंभाचे नियोजन
- सोमवार मार्केट यार्ड उच्च जलकुंभ, भाजी मार्केट उच्च जलकुंभ आणि चोकाणी टाकी येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहील.
- मंगळवार पटेल मोहल्ला आणि पायोनियर उच्च जलकुंभांशी संबंधित भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
- बुधवार एचओसी उच्च जलकुंभ
- आजच्या युवा पिढीला जेन -झी नाही तर नवी पिढी संबोधावे; नवी मुंबईतील दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष योगेश सोमण यांचे प्रतिपादन
- गुरुवार ठाणा नाका उच्च जलकुंभाशी संबंधित साईनगर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.
- शुक्रवार गोल टाकी येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी भाग 1 व 2 आणि एस. के. बजाज परिसरातील पाणी पुरवठा बंद राहील.
- शनिवार गंगाराम सिनेमा उच्च जलकुंभाशी संबंधित टक्का गाव व कॉलनी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील.
पनवेल शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला 41 दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये महापालिका स्वताच्या अप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणातून 16 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) 25 एमएलडी पाणी मिळवते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai