चांदण्याची रात
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 30, 2020
- 1766
मीरा के बोल
ह्या मंद चांदण्या अलगद
अवतरल्या हरीच्या अंगणी
गडद काळोखात चाले खेळ असा
कान्हा सखा अन झाल्या त्या साजणी
बासुरीच्या सुराने त्याच्या
मोहरली ती तार्यांची रात
सारेच बसले हरीच्या बाजुस
कोणी ही दिसेना आकाशात
त्या सुरेल मंतरलेल्या राती
किती ते तेज हरी मुखी
चंद्र ही विचारे येउनी
गुपीत ह्या सार्याचे त्याच्या कानी
चांदण्याची ही मैफिल
कान्हा त्यात शोभूनी दिसे
अवती भवती त्याच्या
जणू मखर तार्यांचे असे ...
हरपुनी गेले भान सार्यांचे
चोर पावलाने पहाट आली
चंद्र तार्यांची आता
निघायची घटीका आली
जीव जडला हरीवर पुन्हा
सोडुन जाता येईना
जड मनाने त्यास निरोप दिला
नभी परतल्या चांदण्या पुन्हा...
- मिरा पितळे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai