साईंच्या दर्शनासाठी भारतीय पेहरावातच यावे
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 01, 2020
- 1065
मंदिर प्रशासनाने लावला विनंती फलक
शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे 16 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली. या निर्णयाअंतर्गत मंदिरं खुली झाली आणि भाविकांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठीसुद्धा देश विदेशातून भाविक येत आहेत. मंदिरात येणार्या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनास यावं असा फलक मंदिर प्रशासनाने लावला आहे.
शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातूनसुद्धा भाविक येत असतात. येणार्या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनास यावं असा आग्रह मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची तातडीने सक्ती करण्यात आलेली नसली तरीही या निर्णयासंबंधीचे सूचना फलक मात्र मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. हे फलक तीन भाषांमध्ये लावण्यात आले असून, भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीवजा मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली आहे.
काही भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलं; तर काही भक्तांनी आपली नाराजीही व्यक्त केली. म्हणजेच एकंदरीत शिर्डी देवस्थानच्या परिसरात येताना भारतीय पेहेरावात नसल्यास प्रवेश नाकारला जाईल या निर्णयाबाबत भक्तगणांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, भारतातील अनेक मंदिरांमध्ये भारतीय पोषाखातच दर्शनाची मुभा देण्यात आली आहे. दक्षिण भारतातील गुरूवायूर मंदिर किंवा अमृतसरमधील सुवर्णय मंदिर या ठिकाणी प्रवेशासाठी ठराविक पेहरावाचीच विनंती मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आणि भाविकांनी त्याचं स्वागतही केलं. आता शिर्डीच्या बाबतीच हेच चित्र पाहायला मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai