संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 15, 2020
- 869
नवी दिल्ली ः सर्वच राजकीय पक्षांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन थेट जानेवारीत होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोरोना व्हायरसमुळे यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोविड 19चा प्रसार टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हे अधिवेशन न घेण्याबाबत मत मांडलं होतं. आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. जोशी यांनी सांगितलं की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या वादग्रस्त नवीन शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन घ्यावं अशा मागणीचं पत्र दिलं होतं. मात्र कोरोनामुळं अधिवेशन होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि कोविडमुळे अधिवेशन घेण्याबाबत सर्वाचं एकमत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai