Breaking News
नवी दिल्ली : कृषी कायदा रद्द करण्यासाठी शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील शेतकर्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकर्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकर्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. सरकारने ज्या योजना सुरु केल्या. त्याचा त्यांना कसा फायदा झाला? गावातील तालुक्यातील इतर शेतकर्यांना त्यांनी याची माहिती दिली का? ते जाणून घेत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (-ींरश्र इळहरीळ तरक्षरिूशश) यांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. शेतकर्यांशी बोलल्यानंतर मोदी देशभरातील 2500 चौपालांमधील शेतकर्यांना संबोधित केले. भाजपने अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस (र्डीीहरपीरप ऊर्ळींरी) म्हणून साजरी करीत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai