Breaking News
अलिबाग : आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक/ युवतींना हेल्थ केअर, मेडिकल व नर्सिंग क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम जप गेल ढीरळपळपस या तत्वावर राबविण्यात येणार आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी निवड केलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांना चडउतढ/डडउ यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त लाभ इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईनद्वारे फॉर्म लिंकवर आपली माहिती भरुन घ्यावी, तसेच ही माहिती जास्तीत जास्त गरजू उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शा.गि. पवार यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai