वाहन उद्योगाला 2022 चे वेध
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 25, 2021
- 744
नव्या वर्षात विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा
मुंबई : 2020 आणि 2021 या दोन वर्षात वाहन उद्योगाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. मात्र नव्या वर्षात हे सर्व मागे सोडून नव्याने सुरूवात करण्याचा निर्धार भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांनी केला असून हे क्षेत्र आश्वासन मानसिकतेने नव्या वर्षात प्रवेश करण्यास सज्ज झालं आहे. नव्या वर्षात कोरोनापूर्व काळातला विक्रीचा टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट या उद्योगाने समोर ठेवलं असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 2022 मध्ये उद्योगाला चालना देण्याच्या दृृष्टीने 2021 मध्येच पाया घालण्यात आला आहे. सेमिकंडक्टर्सच्या कमतरतेमुळे वाहननिर्मितीवर परिणाम झाला असला तरी वाहन उद्योगाने सर्व संकटांवर मात करत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवासी वाहन विभागातल्या वाहनांची मागणी अद्यापही कमी असली आणि उत्पादन खर्च वाढत असला तरी वाहन उत्पादन कंपन्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहन विभागात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे. येत्या काळात इलेक्ट्रॉनिक दुचाकी आणि चारचाकी यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. अशा वाहनांची मागणी वाढणार असल्याचं लक्षात घेऊन कंपन्यांनीही त्यांच्या उत्पादनावर भर दिला आहे. ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे वाहन उद्योग थोडाफार धास्तावला असला तरी मागील दोन वर्षात मिळालेले धडे सद्यपरिस्थितीत कामी येतील, असं वाहन उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वाहन उद्योगाने मोठ्या प्रमाणावर डिजिटायजेशनच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यामुळे तिसरी लाट आली तरी घाबरण्याचं कारण नसल्याचं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.
उपलब्ध बळाचा वापर करण्यापासून पुरवठा साखळ्या, नवतंत्रज्ञानाचा वापर तसंच ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याच्या दृष्टीने डिजिटायझेशनचा वापर या सर्व बाबी आम्ही लक्षात घेतल्या आहेत. या सगळ्या धड्यांमधून वाहन उद्योग पुन्हा उभा राहील. येत्या काळात मागणीचा आलेख चढा राहील, यात शंका नाही. त्यामुळे 2022 हे वर्ष वाहन उद्योगाला नवी दिशा देऊन जाईल. तसंच अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर येत असल्याने त्याचाही लाभ होईल. नव्या वर्षात दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली जाणार असल्याचंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता वाहन क्षेत्र 2022 कडे डोळे लावून बसलं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai