स्वादिष्ट चीज डोसा
- by विजय आहिरे
- May 01, 2023
- 596
महाराष्ट्रात पारंपारिक चविष्ट पदार्थांबरोबर दाक्षिणात्य पदार्थांचीही इथल्या लोकांवर चांगलीच भुरळ पडलेली दिसते. वडापाव बरोबर इडली-वडा, डोसा अशा खाद्य पदार्थांनी सामान्यांच्या ताटामध्ये जागा केली आहे. कधीकाळी फक्त हॉटेलमध्ये मिळणारे हे पदार्थ आता घरोघरी हौसेने बनविले जातात. या दाक्षिणात्य पदार्थांचे वेगवेगळे प्रकार विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यापैकी इडली-डोसासहित वड्याचे अनेक प्रकार खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत. कोपरीगाव येथील रिद्धी-सिद्धी फास्टफूड सेंटर अशाच दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रसिद्ध होत आहे. येथे मिळणारा चीज डोसा खवय्यांच्या मनात घर करत आहे. डोश्याचे विविध प्रकार या ठिकाणी मिळतात. अधिक मागणी असणाऱ्या चीज डोसा बरोबर इथे आपल्याला मसाला डोसा, पनीर डोसा, मैसूर डोसा, उत्तप्पा यांचाही स्वाद घेता येतो. या सर्वांबरोबर मिसळ, इडली-वडा, चहा सुद्धा मिळतो. वर्षभरापूर्वी सुरेश हरी पवार यांनी सुरू केलेल्या फास्टफुड सेंटरवर स्वछतेचीही नेटाने काळजी घेतली जाते. रिद्धी-सिद्धी फास्टफूड सेंटर सकाळी 6 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत तर सायंकाळी 7 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांच्या सेवेत तत्पर असते. दिवसभरात या कालावधीमध्ये सुमारे 350 ते 400 खवय्ये येथे भूक भागविण्यासाठी येतात. येथील चीज डोसा खवय्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. चीज डोसा सोबत इथल्या डोशाच्या इतर प्रकारांनाही तितकाच ग्राहक वर्ग लाभला आहे. इथले सांबर व नारळाची चटणी उत्तम दर्जाची व उत्कृष्ट चवीची आहे. या सर्व कामामध्ये सुरेश पवार यांना त्यांच्या कुटुंबाचे सहकार्य लाभत आहे. इथल्या चीज डोशाला येथे येणाऱ्या ग्राहकांसोबतच पार्सलची ही मोठी मागणी आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून हे फास्ट फूड सेंटर सोशल मीडियावरही तितकेच प्रसिद्ध आहे. घरीबसल्या या पदार्थांची चव चाखायची असल्यास मोफत घरपोच सेवाही उपलब्ध आहे. परंतु त्याआधी या पदार्थांचा आस्वाद प्रत्यक्ष येथे येऊन घेणे नक्की तितकेच संस्मरणीय ठरेल.
- ठिकाण : कोपरी गाव, सेक्टर 26, हनुमान मंदिर रोड, गावदेवी मैदानासमोर, नवी मुंबई.
- काय खाल? : चीज डोसा, मसाला डोसा, पनीर डोसा, साधा डोसा, म्हैसूर डोसा, उत्तप्पा, मिसळ, इडली-वडा सांबर, चहा
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे