राष्ट्रीय नमुना पाहणीला सुरुवात

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय द्वारे दरवर्षी संपूर्ण देशात राष्ट्रीय नमुना पाहणीच्या विविध विषयावर नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन करण्याचे काम करते. या अनुषंगाने जाने-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 व्या फेरीमध्ये देशांतर्गत पर्यटनावरील खर्च व ’’बहुविध निर्देशांक पाहणी’ या विषयावर विस्तृत माहिती गोळा केली जाणार असून महाराष्ट्रामध्ये राज्य नमुन्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत केली जाणार आहे. 78 व्या फेरीमार्फत गोळा करण्यात येणार्‍या माहितीचा उपयोग हा पर्यटनाचे देशाच्या आर्थिक स्थितीमधील महत्व, पर्यटनाशी निगडीत विविध क्षेत्रामधील रोजगार निर्मिती, मागास वर्गीयांचा विकास या सारख्या विविध विषयाकरिता, तसेच णपळींशव छरींळेप ने ठरवून दिलेल्या शाश्वत विकास ध्येय 2030 च्या अनुषंगाने देशस्तरावरील काही महत्वाची निर्देशांक काढण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत येणार्‍या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामधील अधिकारी/कर्मचारी यांना माहिती गोळा करण्यास सहकार्य करुन आवश्यक व योग्य माहिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या कोकण विभागाचे सहसंचालक बा.ना.सबनीस यांनी केले आहे.