Breaking News
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत एनडीए सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प ( 2024) सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सामान्य नोकरदारांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नव्या विषयी घोषणा केली. जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली. नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे 17500 रुपये वाचणार आहेत.
याशिवाय, नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15 हजारावरुन 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकीकडे, सरकारने नवीन कर प्रणालीमध्ये स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा बदलली तर कर स्लॅब देखील पूर्वीपेक्षा सोपे केले आहेत. दुसरीकडे, जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारला सूट वाढवणे अपेक्षित होते, परंतु सरकारने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केलेले नाहीत. आता करप्रणालीतील हे बदल करदात्यांच्या पचनी पडणार का, हे पाहावे लागेल. नव्या करप्रणालीत झालेले बदल नोकरदारांसाठी फायदेशीर ठरणार, असे तुर्तास तरी दिसत आहे.
नव्या करप्रणालीनुसार किती रक्कम भरावी लागणार?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai