ऐरोली, कोपरखैरणे, बेलापूर विभागात अतिक्रमण कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 03, 2025
- 567
मुंबई : उच्च न्यायालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई पालिका अतिक्रमण विभागाने ऐरोली, कोपरखैरणे व बेलापूर विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली कार्यक्षेत्रातील बी-458,बी-459, बी-460, सी-519, सी-520, सी-206 व सी-207, सेक्टर-2 ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम पालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम नमुंमपाच्या अंतर्गत अंशत: निष्कासित करण्यात आले आहे. सदर कारवाई अंतर्गत प्रत्येक बांधकाम धारकाकडून रूपये 25,000/- प्रमाणे एकुण दंडात्मक शुल्क रूपये 1,75,000/- वसूल करण्यात आले आहे.
कोपरखैरणे विभाग अंतर्गत टाईप,रूम नं 400,सेक्टर-7, यांच्या बांधकामास नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली. सदर बांधकाम धारकांकडून रु.10,000/- दंड वसूल करण्यात आला. सदर बांधकामावर तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. बेलापूर विभागाअंतर्गत घर क्र. 288/00185 करावे गांव, से.36 नवी मुंबई, 2) पुनम किशोर पाटील, घर नं. 0824/0005, करावे गांव, से. 36, 3) भरत तांडेल, घर क्र. 823 करावे गांव नवी मुंबई यांचे अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. तसेच संबधित 3 अतिक्रमणधारकांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. त्यामुळे नमुंमपा व सिडको सहसंयुक्तपणे कारवाई केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai