वाशी पोलिसांचे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 25
नवी मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांकडून नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून वाशी पोलिस ठाण्यातर्फे नुकताच फादर ॲग्नेल कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित या कार्यक्रमात सायबर योद्धा सारंग, सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले तसेच सायबर पथकातील अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मूलभूत मार्गदर्शन केले. सुमारे 150 ते 200 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान अनोळखी व्यक्तीस ओटीपी शेअर करू नये,अनोळखी लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नये, डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा प्रकार असून, घाबरून न जाता तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना खात्रीशीर माध्यमाचा वापर करा, अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नका, दुप्पट पैसे, डिस्काउंट किंवा पटकन कर्ज, अशा प्रलोभनांना बळी पडू नका, सायबर फसवणुकीच्या घटनेत तत्काळ 1930 किंवा 1945 या क्रमांकावर संपर्क करा. सावध राहा, सतर्क राहा हेच सायबर सुरक्षेचे खरे ब्रीदवाक्य आहे. हे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
वाशी पोलिसांच्या या उपक्रमाचे उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालय प्रशासनाने कौतुक करून, अशा जनजागृती कार्यक्रमांमुळे सायबर सुरक्षिततेबाबतची जाण नागरिकांमध्ये अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तर सायबर गुन्हे हे आजच्या डिजिटल युगातील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. अशा फसवणुकीपासून नागरिकांना वाचवण्यासाठी जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतः सावध राहून आपल्या कुटुंबीयांनाही सतर्क राहण्याचा संदेश द्यावा, हीच खरी सायबर सुरक्षा आहे, असे वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai