सरळसेवा पदभरती परीक्षा सुव्यस्थित संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 20
नवी मुंबई ः ‘नवी मुंबई महापालिका सरळसेवा भरती 2025- 2026’ प्रक्रियेंतर्गत 21 जुलै रोजी 3 सत्रांमध्ये व 22 जुलै 2026 रोजी 2 सत्रांमध्ये 3 संवर्गातील 13 पदांसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा सुयोग्य नियोजनामुळे अत्यंत सुव्यवस्थितरित्या संपन्न झाल्या. परीक्षेच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी पवई, मुंबई येथील केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडली. कालही 6 जिल्ह्यातील 13 केंद्रांवर नियोजनबध्द रितीने परीक्षा प्रक्रिया संपन्न झाली होती.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एकूण 6 संवर्गातील 36 पदांकरिता 18,930 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने ऑनलाईन स्पर्धा परीक्षा केंद्रांवर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेतील वर्ग 1 श्रेणीचे 8 समन्वय अधिकारी तसेच 13 केंद्र निरीक्षक अधिकारी दक्षतेने कार्यरत होते. या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी, 20 जुलै रोजीच नेमून दिलेल्या जिल्हयांमध्ये जाऊन परीक्षा केंद्रांवरील संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली. त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. ऑनलाईन परीक्षा असल्याने खबरदारी घेत सुरक्षा विभाग, केंद्र सरकार यांच्या मान्यतेने सर्व परीक्षा केंद्रातील परीक्षा कक्षांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्यात आले होते.
कालच्याप्रमाणेच आजही सकाळी ठीक 9.00 वाजता पवई, मुंबई येथील परीक्षा केंद्रांवर परीक्षेस नियोजन केल्याप्रमाणे वेळेवर सुरुवात झाली. आजच्या दोन्ही सत्रांमधील परीक्षा प्रक्रीया व्यवस्थित पार पडली. सकाळी 9 ते 11 वा. या पहिल्या सत्रात 588 उमेदवारांनी परीक्षा दिली. दुपारी 1 ते 3 वा. या दुसऱ्या सत्रात 422 उमेदवारांनी परीक्षा दिली. अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा भरती प्रक्रियेतील दुसऱ्या दिवशी 1010 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. नवी मुंबई महापालिकेची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने नियमानुसार काटेकोरपणे होत असून उमेदवारांनी नोकरी मिळवून देण्यासाठी कोणीही व्यक्ती कोणत्याही प्रकारची मागणी करीत असल्यास दक्ष रहावे व स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच याबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेबाबतच्या यापुढील अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ तसेच महापालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
- सत्ताधाऱ्यांना चपराक
महापालिकेच्या भरती प्रक्रियेत स्थानिकांनाच प्राधान्य द्या अशी मागणी करत सत्ताधारी भाजप नेत्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मदतीने 132 पदांसाठी मंगळवारी सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेलाच आक्षेप घेत ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा अजब निर्णय घेतला. या निर्णयामुळे परिक्षार्थींमध्ये संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेता आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने हा निर्णय सरकारला कळविला आणि सायंकाळी उशीरा सरकारने सत्ताधारी भाजप नेत्यांनी घेतलेला यासंबंधी ठरावच रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर मंगळवारी नियोजीत वेळेनुसार भरती परिक्षा सुरू झाली खरी मात्र महापालिकेतील सत्ताहट्टामुळे महापालिकेची मात्र पुन्हा एकदा नाचक्की झाली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai