8,795 ईडब्ल्यूएस सदनिकांची सोडत
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 18
नवी मुंबई ः सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा ीी1ं चॉइस’ गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या 8,795 सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार, दि. 20 जुलै 2026 रोजी सिडको भवन येथे अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते संपन्न झाली.
सदर सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. डिसेंबर 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे व खारकोपर येथे 8,795 ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यासाठी 10,832 अर्ज प्राप्त झाले होते. सोडत पूर्णतः पारदर्शक व मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडली असून यशस्वी अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अन्य प्रवर्गातील सदनिकांची सोडत उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे
या प्रसंगी बोलताना अश्विन मुद्गल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे लक्ष्य असून, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नामांकित कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आराखडा यांमुळे सिडकोची घरे गुणवत्तापूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai