352 जणांनी केले रक्तदान
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 18
नवी मुंबई : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, यानेच वाचतील हजारो प्राण! या ब्रीदवाक्याला जागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 352 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर पार पडले. निलेश म्हात्रे यांनी स्वतः प्रथम रक्तदान करुन शिबिराची सुरुवात केली. बेलापूर रेल्वे स्टेशन, सीवूड्स, सानपाडा आणि भाजपा कार्यालय वाशी अशा विविध ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत युवक, महिला आणि नागरिकांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला.
एमजीएम हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक, सर्व स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि रक्तदात्यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले. भविष्यातही अशाच प्रकारे लोकहिताचे उपक्रम राबवले जातील, असा विश्वास आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai