सावधान! पदभरतीभरतीविषयक अफवांवर विश्वास ठेवू नका
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 14, 2026
- 38
नवी मुंबई ः महापालिकेच्या आस्थापनेवरील गट-अ, गट-ब व गट-क मधील 20 संवर्गातील 132 रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी दि.14/12/2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 19,220 अर्ज प्राप्त झाले आहेत.
नवी मुंबई महापालिका सरळसेवा भरती 2025-2026 अंतर्गत गट-अ, गट-ब व गट-क मधील एकुण 6 संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.21/07/2026 व दि.22/07/2026 रोजी एकुण 6 जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रांवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. तथापि काही उमेदवारांना कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदाचा निकाल जाहीर झाल्याचे व त्यांची नियुक्ती झाल्याबाबतचे बोगस संदेश ईमेलव्दारे पाठविण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच मूळ कागदपत्रांच्या पडताळणीकरिता प्रोसेसींग फी रू.9373 भरण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून उपरोक्त पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे संदेश पाठविण्यात आलेले नाहीत.
नवी मुंबई महापालिकेची भरती प्रक्रिया ही अत्यंत काटेकोर व पारदर्शक पध्दतीने होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करणाऱ्या भूलथापांना व आमिषांना उमेदवारांनी बळी पडू नये आणि याबाबत दक्ष राहून थेट स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी, असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी नवी मुंबई महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ तसेच पालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai