‘निश्चय केला स्वच्छतेत नंबर पहिला’
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 11
4751 शहरांना मागे टाकत नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक
नवी मुंबई : देशातील स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत नवी मुंबईने यंदा ऐतिहासिक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ मध्ये देशातील 4751 शहरांना मागे टाकत नवी मुंबईने देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापौर सुजाता पाटील यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते.
‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय समोर ठेवून नवी मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून स्वच्छतेच्या क्षेत्रात नियोजनबद्ध काम सुरू ठेवले होते. दरवष स्वच्छतेतील मानांकन उंचावत अखेर यंदा देशात अव्वल स्थान मिळवण्यात महापालिकेला यश आले. प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, स्वच्छताकम आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे. हा पुरस्कार संपूर्ण नवी मुंबईकरांचा असून स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखी यांचे योगदान सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा सन्मान त्यांच्यासह शहरातील सर्व नागरिकांना समर्पित करीत असल्याची भावना महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केली. उपमहापौर दशरथ भगत यांनीही स्वच्छताकर्मींच्या योगदानाचे कौतुक करत आगामी काळात ‘सुगंधी शहर अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या यशामागे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले. दैनंदिन स्वच्छतेची गुणवत्ता राखणे, कचरा संकलन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वापर, ओल्या-सुक्या कचऱ्याचे वगकरण आणि त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया अशा विविध उपाययोजनांमुळे नवी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले. विशेष म्हणजे, वस्त्र कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणारे देशातील पहिले केंद्र यशस्वीपणे कार्यान्वित करणे, पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्य देणे, प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, तसेच ‘मायएनएमएमसी’ ॲप आणि सिटीझन ग्रीव्हन्स पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करणे, या बाबीही महत्त्वपूर्ण ठरल्या. स्वच्छता मोहिमांमध्ये विद्याथ, युवक आणि विविध सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यावरही महापालिकेने भर दिला. दरम्यान, नवी मुंबईने यापूव मिळवलेली स्वच्छतेतील आघाडी कायम राखत ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील स्थान, सप्ततारांकित कचरामुक्त शहर आणि वॉटर प्लस प्रमाणपत्राची ओळखही टिकवून ठेवली आहे. त्यामुळे यंदाचा प्रथम क्रमांक हा शहराच्या सातत्यपूर्ण स्वच्छता व्यवस्थापनावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai