एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची तपासणी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 28, 2026
- 24
20 ते 30 नोव्हेंबरदरम्यान पनवेल आरटीओची विशेष तपासणी मोहीम
पनवेल : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी बसविलेली नसलेल्या वाहनांविरुद्ध पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 20 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान नियमानुसार एचएसआरपी बसविणे बंधनकारक असतानाही नंबर प्लेट बसविली नसलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतील निर्देश आणि परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या 19 नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथके आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख रस्ते, महामार्ग, तपासणी नाके व गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसेच प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांवर नियमानुसार एचएसआरपी बसविण्यात आली आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायदे व नियमांनुसार जागेवरच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पनवेल, उरण, खालापूर व कर्जत या कार्यक्षेत्रातील ज्या वाहनधारकांनी अद्याप एचएसआरपी बसविलेली नाही, त्यांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तातडीने अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अधिकृत फिटमेंट सेंटरमध्ये नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी करावी. पनवेल, खारघर, कळंबोली, उलवे, करजत, तळोजा, उरण, जुने पनवेल, वडखळ आदी परिसरांत अधिकृत फिटमेंट सेंटर उपलब्ध आहेत. वाहनधारकांनी वेळेत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी बसवून नियमांचे पालन करावे आणि विशेष तपासणी मोहिमेत दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai