Breaking News
पनवेल ः शिक्षणक्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी राजभाषा दिन’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते ग्रंथदिंडीच्या पूजनाने झाली. राजभाषा दिनानिमित्त विद्यालयात ग्रंथदिंडी, लेझीम पथक, मराठी भाषा महत्व पर घोषणा, गीते, भाषण या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मराठी मायबोलीचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. व प्रत्येक विविध भाषा बोलणार्या प्रत्येकाला मराठी भाषेचे महत्व पटले पाहिजे. तसेच त्यांनी विदयार्थ्यांना मराठी मायबोलीचे महत्व पटवून दिले व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या . या उपक्रमाबददल संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, संचालक व आमदार प्रशांत ठाकूर, तसेच संस्थेच्या पदाधिकार्यांनी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai