पनवेल बस स्थानक सीसीटीव्हीच्या नजरेत
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 12
पनवेल : पनवेल बस स्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापणे, बॅगा लंपास करणे तसेच हातसफाईच्या माध्यमातून चोरी करण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पनवेल महापालिकेच्या सहकार्याने बस स्थानकाच्या बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून नागरिकांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
पनवेल बस स्थानकात एसटी महामंडळाच्या माध्यमातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, बस स्थानकाच्या बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने प्रवाशांचे खिसे कापणे, बॅगा पळविणे आणि अन्य चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. बस स्थानकाबाहेर घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या.सदर बाब लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पनवेल महापालिका प्रशासन तसेच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुन सीसीटीव्ही बसविण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अभिजीत पाटील यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी या महत्त्वाच्या कामासाठी तातडीने लेखी परवानगी दिल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याचा मार्ग मोकळा झाला. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात प्रवाशांची वाढती गद लक्षात घेता सदर सुविधा सुरु होणे महत्त्वाचे मानले जात आहे. आता बस स्थानकाच्या बाहेरील परिसरातील हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासह गुन्हेगारांचा शोध घेण्यासही मदत होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai