उड्डाणपुलावर फटाके फोडणे भोवले
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 13, 2026
- 17
16 वषय युवक 50 ते 60 फूट खाली चिखलात पडला
पनवेल : नुकतेच लोकार्पण झालेल्या कर्नाळा स्पोर्ट्सजवळील उड्डाणपुलावर फटाके फोडणे 16 वषय युवकाला चांगलेच महागात पडले. फटाके फोडताना तोल जाऊन हा युवक पुलावरून सुमारे 50 ते 60 फूट खाली चिखलात पडला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. प्रतिकूल परिस्थितीत सुमारे दीड किलोमीटर पायी चालत घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी दोरखंडांच्या साहाय्याने युवकाला सुखरूप बाहेर काढले.
या पुलावरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि उलवेच्या दिशेने वाहतूक सुरू आहे. पुलावर फटाके फोडण्यासाठी गेलेला पनवेलमधील लाइन आळी परिसरातील हा युवक पुलावरून खाली पडला. त्याचवेळी पुलावरून जात असलेल्या अग्निशमन दलातील सागर जाधव यांनी ही घटना पाहून तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. पुलाखालील चिखलात पडलेल्या युवकापर्यंत पोहोचण्यासाठी जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. बचावकार्याची जोखीम लक्षात घेऊन अतिरिक्त साहित्य आणि मनुष्यबळ मागविण्यात आले. दोन जवानांनी सुमारे दीड किलोमीटर अंतर पायी पार करून घटनास्थळ गाठले. त्यानंतर तीन दोरखंड, बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि टॉर्चच्या साहाय्याने युवकाला सुरक्षितपणे वर काढण्यात आले. त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आले. या युवकाच्या उजव्या हाताला आणि तोंडाच्या जबड्याला मार लागला आहे. हा युवक सध्या सूखरूप आहे. कर्नाळा स्पोर्ट्सजवळील विमानतळाकडे जाणाऱ्या नवीन उड्डाणपुलावर काही ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या परिसरात गद करू नये तसेच पुलावर फटाके फोडू नयेत असे आवाहन प्रविण बोडखे, मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी केले आहे.
या धाडसी बचावकार्यात उपअग्निशमन केंद्र अधिकारी शुभम राठोड, प्रमुख अग्निशमन विमोचक शिवा आडे, यंत्रचालक आकाश नलवडे व शिवलाल अलदर तसेच अग्निशामक शुभांगी घुले, शंकर वाकडे, विक्रांत सपकाळ, सुनील मोरे, प्रीतम पाटील, निकितेश डुकरे आणि प्रणय म्हसकर यांनी सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि समन्वय यामुळे युवकाची सुखरूप सुटका करणे शक्य झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai