Breaking News
नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोविड-19 मुळे निधन झालं. पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री कोरोनाला बळी पडले आहेत. ते 65 वर्षांचे होते. अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे दिल्लीच्या एआयआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुरेश अंगडी 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्विट करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्या, असं आवाहनही केलं होतं. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अंगडी यांना दिल्लीच्या एआयआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यांची प्रकृती गंभीर होती. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेश अंगडी यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai