पोलीसाची गळफास घेऊन आत्महत्या

नवी मुंबई ः खारघर पोलिस स्टेशन नेमणूक असलेले पोलीस हवालदार संतोष नामदेव पाटील, वय 47, यांनी मंगळवारी खारघर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सलग तीन दिवस तीन पोलीसांच्या झालेल्या मृत्यूमुळे नवी मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. 

खारघर पोलिस स्टेशन नेमणूक असलेले पो हवा संतोष पाटील हे काही दिवसापासून आजारी असल्याने गैरहजर होते. पाटील यांनी गळफास घेतला त्यावेळी पत्नीसह दोन मुली घरात होत्या. त्याच सोसायटीमध्ये राहणारे पो हवा सतीश पवार वाशी वाहतूक यांनी त्यांना तेरणा हॉस्पीटल येथे उपचार करण्यासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. सदरची घटना समजताच वपोनि शत्रुघ्न माळी हे घटनास्थळी पोहचले. पुढील अंतिम विधी त्याचे मुळगावी पाचोरा येथे होणार आहे.

रविवारी एपीएमसी पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षक भूषण पवार यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सोमवारी महाजन यांचे हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज मंगळवारी संतोष पवार यांच्या आत्महत्येची घटना घडली. लागोपाठ तीन पोलीसांच्या निधनाच्या घटनांमुळे नवी मुंबई पोलिसदलात हळहळ व्यक्त होत आहे.