वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजन करा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 30, 2021
- 426
कायदा राबवण्याची वेळ येऊ देऊ नका; एकनाथ शिंदेंची अधिकार्यांना तंबी
उरण : ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडीवरून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी काळजी घ्या, कायदा राबवण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी तंबीच एकनाथ शिंदे यांनी वाहतूक विभागाच्या अधिकार्यांना दिली आहे.
एकनाथ शिंदे बुधवारी उरणच्या द्रोणगिरी येथे आले होते. यावेळी त्यांनी उरणच्या पार्किंग स्लॉटची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाहतूक कोंडीमुळे अनेकांना त्रास होत आहे. त्यासाठी आता आपण नवी मुंबई येथील जेएनपीटी, उरण व द्रोणागिरी या भागात जागेची पाहणी करत आहोत. जेएनपीटी उरण येथील 100 हेक्टर तर द्रोणागिरी या ठिकाणी 50 एकर जागा आहे. तसेच ठाणे खारेगाव, शहापूर, पालघर या भागात देखील पाहणी करत आहोत. लवकरात लवकर रायगड, ठाणे आणि पालघर या भागातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेले खड्डे दूर करू, असं त्यांनी सांगितलं.
ज्या ज्या पार्किंगमध्ये जाणार आहे त्या त्या यार्डातील गाड्यांचे स्टिकर कोड लावा. अवजड वाहने चुकणार नाहीत याची काळजी घ्या. जे चुकतील त्यांना दंड लावा. वाहतूक विभागाकडून अवजड वाहने वेळेत अडवू नका. सीएसएफची 45 हेक्टर जागा आहे. या ठिकाणी 2 हजार 830 अवजड वाहने उभे राहू शकतात. 8 तासाचे 100 रुपये आकारले जातात, असं सांगतानाच प्रत्येकाला ज्या यार्डात जायचे असेल त्या वाहनांना स्टिकर कोड लावा. म्हणजे 80 % वाहतूक कोंडी होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. वाहतूक कोंडी होता कामा नये. प्रवाशांना नाहक त्रास होऊ नये. त्यासाठी रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील वाहतूक विभागाने अधिक काळजी घ्यावी, अशी सूचना शिंदे यांनी वाहतूक विभागाला केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला आहे. त्याची दखल खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शिंदे यांनी ठाण्यातील खड्डयांची पाहणी करून अधिकार्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या चार अभियंतांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai