जानेवारीत वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन!
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2021
- 460
नवी मुंबई ः रस्ते मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय सोयीस्कर असल्याने मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सुरु करण्यात येणार आहे. या बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीत करण्यात येणार आहे. या टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास अत्यंत कमी वेळेत करता येईल. मुंबई ते नवी मुंबईपर्यंत रस्ते मार्गाने जाण्यासाठी टॅक्सीद्वारे सव्वा तास ते पावणे दोन तास लागतो. मात्र नव्या वॉटर टॅक्सीद्वारे हा वेळ 30 मिनिटांपेक्षा कमी लागेल.
जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मुंबईच्या रस्ते वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई ते नवी मुंबई बोटसेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपासून या सेवेच्या उद्धाटनाची प्रतिक्षा आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेच उद्धाटन केले जाणार आहे. या वेळी पंतप्रधान मुंबई पोर्ट ट्रस्टमधील केमिकल टर्मिनलचेही उद्घाटन करतील आणि बंदरातील दुसर्या केमिकल टर्मिनलचे भूमिपूजन करतील. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी समन्वय साधून तारीख निश्चित केली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. मोजक्या जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार ओह.
प्रवाशांना इथपर्यंत येण्यासाठी चर्चगेट, सीएसटी, नरिमन पॉइंट, गेट वे ऑफ इंडिया, डीसीटी, डॉकयार्ड, बेलापूर, नेरुळ आणि जेएनपीटी अशा विविध ठिकाणी पूल कॅब असतील. या शेअर अ कॅब तत्त्वावर असतील. त्यासाठी प्रति व्यक्ती 20 ते 30 रुपये भाडे आकारले जाऊ शकते. तसेच ुरींशीींरुर्ळाीालरळ.लेा या वेबसाइटवर तिकिटाचे ऑनलाइन बुकिंग एक दिवस आधी करावे लागेल, असेही संबंधित अधिकार्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि सिडको यांनी एकत्रितपणे काम केले. मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबईतील फेरी वार्फ येथे डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल उभारले तर सिडकोने नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरूळ येथील टर्मिनलचे बांधकाम केले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
- टॅक्सीच्या फेर्या आणि भाडे कसे?
या वॉटर टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबईतील दोन जेट्टीदरम्यान प्रवाशांना वाहतूक करता येईल. यात जेएनपीटी येथे एक स्टॉप असेल. दुसरी सेवा मुंबई ते रायगड जिल्ह्यातील रेवस दरम्यान असेल. मात्र या सुविधांसाठीचे भाडे काहीसे महाग आहे. जलमार्गाची ही सेवा खासगी ऑपरेटरकडे सोपवण्यात आली आहे. या सुविधेकरिता सध्या 50 आसनी, 40 आसनी, 32 आसनी आणि 14 आसनी अशी चार जहाजे आहेत. याद्वारे 25 नॉट्सच्या वेगाने प्रवास करू शकतो.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai