सिडको युनियनवर पुन्हा प्रगती पॅनेल
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 09, 2022
- 611
नवी मुंबई : सिडकोच्या 50 वर्षाच्या काळात प्रथमच कर्मचारी युनियनच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध करून कर्मचार्यांनी एकजुटीचे दर्शन घडवले आहे. युनियनच्या अध्यक्ष पदासाठी प्रगती पॅनलचे विनोद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकार्यांनी केली आहे.
मुदत संपलेल्या सिडको एम्प्लॉईज युनियनच्या नवीन कार्यकारणीच्या निवडीकरिता 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होती. यासाठी एकता पॅनेलच्या उमेदवारांनी दाखल केलेले चारही उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे प्रगती पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 15 वर्षांपासून सिडको एम्प्लॉईज युनियनवर फडकत असलेला प्रगती पॅनेलचा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष नीलेश तांडेल सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची हंगामी जबाबदारी युनियनचे उपाध्यक्ष विनोद पाटील सांभाळीत होते. कोरोना संसर्गामुळे दोन वर्ष नवीन कार्यकारिणीची निवड होऊ शकली नव्हती. कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने युनियनने रीतसर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पंधरा वर्षांपासून युनियनवर पकड असलेल्या प्रगती पॅनेलच्या पदाधिकार्यांनी कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांना वेळोवेळी सुविधा मिळवून दिल्याने विद्यमान कार्यकारिणीने कर्मचार्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच विद्यमान युनियनच्या पदाधिकार्यांविरोधात म्हणजेच प्रगती पॅनेल विरोधात एकता पॅनल उमेदवार देऊ शकले नाही. 25 सदस्यांच्या कार्यकारिणीकरिता एकता पॅनेलने अवघे चार सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र शुक्रवारी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निरीक्षक नितीन घरत यांनी युनियनच्या अध्यक्ष पदी प्रगती पॅनलचे विनोद पाटील यांची तर सरचिटणीसपदी जे. टी. पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. युनियनच्या उपाध्यक्षपदी नरेंद्र हिरे, संजय पाटील, तर चिटणीसपदी नितीन कांबळे व खजिनदार पदी दत्ता तांडेल हे निवडून आले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai