अर्थसंकल्पात एनएमएमटीच्या उत्पन्न वाढीवर भर देणार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 25, 2022
- 792
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाबरोबर नवी मुंबई परिवहन उपक्रमाचाही अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला. परिवहन उपक्रम तोट्यात असल्याने वाहतूक उत्पन्नाखेरीज बाह्य उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आगामी कालावधीत परिवहन उपक्रमाने विद्युत बसेस आणि बस स्थानकांचा वाणिज्यिक वापरातून उत्पन्नवाढीवर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आता आरंभीच्या शिलकीसह एकूण महसुली व भांडवली जमा रु. 372 कोटी 47 लाख 79 हजारमधून महसुली व भांडवली खर्च रु. 372 कोटी 37 लाख 97 हजार वजा जाता 9 लाख 83 हजार रुपये शिलकीचे जमा-खर्चाचे अंदाज सादर करण्यात आले आहेत. परिवहन उपक्रमास होणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढवून इंधन खर्चात कपात करण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. वाहतूकबाह्य उत्पन्नात वाढ करण्यासाठी बस आगार व बस स्थानकांचा वाणिज्यिक तत्त्वावर विकास करण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने वाशी सेक्टर 9, वाशी येथील भूखंडाच्या वाणिज्यिक विकासाचे काम सुरू झाले आहे. यामधून पालिकेला प्रतिवर्षी 75 कोटी उत्पन्न प्राप्त होईल असा अंदाज आयुक्तांनी वर्तवला आहे. वाशी सेक्टर 12 येथील भूखंडावर बांधण्यात येणार्या अद्ययावत आंतरक्रीडा संकुलाच्या तळमजल्यावर बसस्थानकासाठी 12 बस थांबे व 3 बससाठी बसस्थानके असणार आहेत. तळमजला व पहिल्या मजल्यावर सामायिक 12 दुकाने प्रस्तावित करण्यात आली आहेत. याच धर्तीवर कोपरखैरणे व बेलापूर येथील भूखंडांचा वाणिज्यिक विकास करून प्रतिवर्षी 50 कोटी इतके उत्पन्नाचे नियोजन करण्यात येणार आहे. याद्वारे परिवहन उपक्रम स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. इको-मोबिलिटीवर भर देत सद्य:स्थितीत परिवहन उपक्रमात 180 विद्युत बस असून 86 विद्युत बस खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसची संख्या 266 होणार आहे. आगामी तीन वर्षांत इको फ्लिटचे नियोजन करण्यात आले आहे. परिवहन उपक्रमास प्राप्त होणारे उत्पन्न व त्यातून करावा लागणारा अत्यावशक खर्च याचा ताळमेळ ठेवून नवी मुंबईतील प्रवाशांच्या गरजेनुसार अधिक चांगली सेवा देण्याकरिता पर्यावरणपूरक आणि प्रदुषणरहित विद्युत बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- वैशिष्टये
1. नवी मुंबई शहरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांसाठी डबलडेकर बसची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
2.पर्यावरणपूरक 50 विद्युत बसेस जीसीसीवरती तसेच राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत 25 विद्युत बसेस खरेदीचे नियोजन आहे.
3.पर्यावरणपूरक बससेवा देण्यासाठी डिझेलच्या बसेस विद्युत आणि सीएनजीमध्ये बदल करण्याचे नियोजित आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai