कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 05, 2022
- 612
नवी मुंबई ः प्लास्टिकचे विघटन हजारहून अधिक वर्ष होत नसल्याने मानवी जीवनाला व पर्यावरणाला मोठया प्रमाणात हानी पोहचत आहे. त्यामुळे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर नागरिकांनी पूर्णपणे थांबवावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे तसेच दंडात्मक कारवाईव्दारे समजही दिली जात आहे.
यादृष्टीने ‘स्वच्छ भारत मिशन’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम परिमंडळ-1 परिक्षेत्रात राबविण्यात आला. यामध्ये बेलापूर, वाशी, नेरुळ, तुर्भे येथील विविध मार्केट्समध्ये प्लास्टिक प्रतिबंधाविषयी विक्रेते व ग्राहक यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली तसेच ग्राहक नागरिकांना कापडी पिशव्यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा यादृष्टीने या विशेष उपक्रमाअंतर्गत 1 हजार कापडी पिशव्यांचे वाटप सेक्टर 9 वाशी मार्केट, सेक्टर 18 तुर्भे मॅफको मार्केट, सेक्टर 29 नेरुळ मार्केट, सेक्टर 3 सीबीडी बेलापूर मार्केट येथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुर्णपणे थांबवून कापडी पिशव्यांचा वापर नियमीत करावा असे आवाहन करण्यात आले. त्यासोबतच मार्केट्स मधील प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा असे विक्रेत्यांनाही सूचित करण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्यास आकारण्यात येणार्या दंडात्मक कारवाईची माहितीही देण्यात आली.
यावेळी परिमंडळ 1 व 2 मध्ये प्लास्टिक प्रतिबंधासह स्वच्छतेची जनजागृती करीत फिरणार्या वाहनांचीही पाहणी करण्यात आली व त्यामध्ये बदल सूचविण्यात आले. याप्रसंगी रमाबाई आंबेडकर नगर, सीबीडी बेलापूर येथे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या वापरलेल्या बाटल्या देऊन नाश्त्याचे कूपन देण्याच्या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मनोहर मिष्टान्न, सीबीडी बेलापूर यांच्या माध्यमातून ही अल्पोपहार कूपन उपलब्ध करुन देण्यात आली. या उपक्रमामध्ये समाजविकास विभागातील समुह संघटक यांनी महिला बचत गटांपर्यंत पोहचून या उपक्रमातील लोकसहभाग वाढीसाठी विशेष योगदान दिले. प्लास्टिक चा वापर हा पर्यावरणाची हानी करणारा असून याविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणारे हे दोन्ही उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai