मनसेचे ढोल वाजवा आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 12, 2022
- 666
नवी मुंबई ः नवी मुंबई मनपा कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दि.11 मार्च रोजी मनसे मनपा कामगार कर्मचारी सेनेतर्फे मनपा मुख्यालयावर हजारोंच्या संख्येने ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स ते मनपा मुख्यालय असा हजारो कामगारांच्या सहभागाने झाला.
मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी आयुक्तांनी मनसेच्या मागण्या मान्य करत कोविडमुळे मृत 13 कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना पंधरा दिवसांत महापालिकेतर्फे 5 लाख रुपये भरपाई देण्याचे मान्य केले. तसेच राज्य शासनाला देखील या मृत कामगारांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी तात्काळ अहवाल पाठवणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी मनसेच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले. समान काम समान वेतन साठी अति. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत कामगारांचे प्रतिनिधी देखील घेतले जातील असे आश्वासन दिले. जर या मोर्चा नंतर देखील मनपा प्रशासनाला जाग आली नाही, तर कोरोना मुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांसमवेत आयुक्त अभिजित बांगर यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा थेट इशारा मनसे सरचिटणीस, प्रवक्ते व मनपा कामगार सेना अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी याप्रसंगी दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai