आमदारांना घरे देण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी पुणे ते मुंबई पायी प्रवास
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 04, 2022
- 584
मुंबई ः आमदारांसाठी मुंबईत 300 घरे बांधणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याचे स्वागत करुन आमदारांना घरे देण्याची घोषणा केली. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही आमदारांनी या घोषणेचं स्वागत केले तर काही आमदारांनी मात्र या घरांना विरोध केला आहे. आम आदमी पक्षाचे पुण्याचे कार्यकर्ते इम्रान खान यांनी या निर्णयाचा निषेध म्हणून पुणे ते मुंबई पायी प्रवास सुरु केला आहे.
आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधक देखील यावरून सरकारवर टीका करत आहेत. आम आदमी पक्षाच्या पुण्यातील इम्रान खान या कार्यकर्त्याने हा निर्णय रद्द करण्यासाठी व सरकारच्या या निर्णयाचा निषेध म्हणून पुणे ते मुंबई पायी प्रवास करीत आहेत. आमदारांना घरे देण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या अनेक अडचणी आहेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्राथमिक सुविधांचाही अनेक ठिकाणी बट्ट्याबोळ झाल्याने त्या समस्यांना प्राधान्य न देता आमदारांना घरे देण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याने त्यावर अनेक स्तरातून विरोध होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai