1000 बांबूची वृक्ष लागवड
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 07, 2022
- 776
नवी मुंबई ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील परिसरात गणपतशेठ तांडेल मैदानाच्या बाजूला बुध्दा बेली बांबूच्या 1000 वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणात लोकसहभाग हे सूत्र नजरेसमोर ठेवून या वृक्षारोपणामध्ये सायकल क्लब ऑफ इंडिया या पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थेच्या 185 सदस्यांनी उत्साहाने सहभागी होत वृक्षलागवड केली.
या ठिकाणी बुध्दा बेली बांबू या वातावरणातील ऑक्सिजन वाढण्यासाठी पूरक असणार्या विशिष्ट प्रकारच्या बांबूची लागवड केल्यामुळे वायू शुध्दतेसाठी मदत होईल तसेच या बांबूचा उपयोग ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक आणि वायू प्रतिबंधक म्हणूनही होईल. हे बांबूचे वृक्षारोपण मियावाकी शहरी जंगलाच्या वृक्ष लागवडीपासून जवळच केलेले असल्यामुळे पक्षी, किटक व फुलपाखरे यांची वाढ होऊन येथील जैवविविधतेत लक्षणीय भर पडणार आहे. त्याचप्रमाणे या बांबूची लागवड पक्षांना घरटी करण्यासाठीही उपयुक्त असल्याने पक्ष्यांचा वावर वाढणार आहे. प्रशासन व उद्यान विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त मिताली संचेती, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, उद्यान अधिक्षक विजय कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. यावेळी माझी वसुंधरा अभियानाची शपथ सामुहिकरित्या ग्रहण करण्यात आली.मागील 2 वर्षात दोन लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai