विमानतळ क्षेत्र विकासासाठी सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2022
- 638
पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावांमधील एकूण 3070 बांधकामे निष्कासित करण्यात आली असून 1160 हे. क्षेत्रफळ विमानतळ सवलतदार यांना हस्तांतरीत करण्यात आले आहे. तसेच या गावांतील सुमारे 5,000 हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रातील पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे सिडकोतर्फे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
सिडकोतर्फे रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यामध्ये 10 गावे संपादित करून 1160 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. विमानतळ प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाकरिता सिडकोतर्फे विमानतळ क्षेत्रालगत पुष्पक नगर हे सर्व भौतिक, सामाजिक व सांस्कृतिक पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. आतापर्यंत विमानतळ गाभा क्षेत्रातील 3,070 इमारती सिडकोकडून निष्कासित करण्यात आल्या आहेत. निष्कासित करण्यात आलेल्या इमारतींमधील 5,000 हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रात स्थलांतर करण्याचे प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सार्वजनिक वापरातील इमारती, चर्च तसेच सार्वजनिक व खासगी मालकीची मंदिरे मिळून एकूण 56 मंदिरांचे पुनर्वसन क्षेत्रात स्थलांतर करण्यात आले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने मूर्तींची सन्मानपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. समाज मंदिर, शाळा आणि स्मशानभूमी मिळून एकूण 27 बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.
प्रकल्पबाधितांच्या सहकार्यामुळेच विमानतळ प्रकल्पातील आजवरचे महत्त्वाचे टप्पे सिडकोने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्ण क्षेत्र विकासासाठी उपलब्ध करून देण्याचे आव्हानात्मक काम देखील यास अपवाद नव्हते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नियोजित वेळेनुसार पार पडत असून हा प्रकल्प मार्गी लागला आहे.- डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai