13 कर्मचार्यांच्या कुटुंबियांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 24, 2022
- 679
2018 नंतर प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही
नवी मुंबई ः महानगरपालिका सेवेत असताना ज्या अधिकारी, कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे अशा अधिकारी, कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याबाबतची तरतूद आहे. अशा प्रकारचे प्रस्ताव सन 2018 पासून प्रलंबित होते. आयुक्तांच्या आदेशानुसार त्यावर कार्यवाही करीत सन 2018 नंतर पहिल्यांदाच महापालिका सेवेत असताना मृत्यू झालेल्या 13 अधिकारी, कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांना बुधवारी लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
सन 2018 पासून अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज दाखल केलेल्या महापालिका सेवेत असताना मृत्यू झालेल्या महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांच्या प्रतिक्षा सूचीतील अर्जावर निर्णय घेत 13 कुटुंबियांना कार्यालयीन प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर लिपिक-टंकलेखक पदावर थेट नियुक्ती आदेश देण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधास 21 ऑगस्ट 2017 रोजी शासन मंजूरी प्राप्त झाली असून 30 मार्च 2021 च्या शासन अधिसूचनेनुसार सेवाप्रवेश नियमावली लागू करण्यात आलेली आहे. यामधील शैक्षणिक व तांत्रिक अहर्तेनुसार अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी प्राप्त अर्जांमधील क संवर्गातील 10 तसेच ड संवर्गातील 18 पात्र अर्जदारांचा प्रस्ताव अधिसंख्य पदाच्या मान्यतेकरिता शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. तथापि दरम्यानच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत लिपिक-टंकलेखक पदावरील कर्मचार्यांची वरिष्ठ पदावर पदोन्नती झाल्याने त्या जागा रिक्त झाल्या. या जागांवर अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या प्रतिक्षा सूचीतील अहर्ताधारक 13 पात्र अर्जदारांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली व तसे नियुक्ती आदेश त्यांना प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.
वाहनचालक, सुरक्षारक्षक, कक्षसेविका, स्वच्छता निरिक्षक, अग्निशामक, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध पदांवर महानगरपालिकेत नोकरी करत असताना आमचे आई किंवा वडील यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर अचानक ओढविलेल्या संकटातून सावरण्यासाठी महानगरपालिका सेवेत सामावून घेतल्याने हा आमच्यासाठी फार मोठा आधार असल्याची भावना नियुक्ती आदेश घेताना या नवनियुक्त कर्मचार्यांनी व्यक्त केली. मागील 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील 13 महापालिका कर्मचार्यांच्या कुटुंबियांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या कुटुंबाला मदत होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai