पालिका कर्मचार्यांची तिरंगी मानवी एकता साखळी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 31, 2022
- 504
नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनमोल योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनाचे अर्थात राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समवेत सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी मानवी एकता साखळी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रसारित केला.
पंतप्रधान महोदय यांनी जाहीर केलेल्या पंचप्राण संकल्पनेत एकता ही एक महत्वाची संकल्पना आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील एकता व अखंडतेसाठी अनमोल योगदान दिले आहे. त्यांच्या देशभक्तीचा यथोचित सन्मान करण्यासाठी शासन निर्देशानुसार एकतेचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने एकता दिनानिमित्त महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी एकतेचा संदेश प्रसारणासाठी अभिनव पध्दतीने तिरंगी मानवी एकता साखळीचे आयोजन करून राष्ट्राची एकता व अखंडता समर्थ राखण्यासाठी एकतेचे आवाहन केले. वास्तुरचनेचा देशातील एक उत्तम नमुना असणार्या महानगरपालिकेच्या आयकॉनिक वास्तूसमोर सर्व्हिस रोडवर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे आणि सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी या मानवी एकता साखळीत सहभागी होत हातात सलग तिरंगा पकडून राष्ट्रभक्तीचे एकात्म दर्शन घडविले. पावसाळी कालावधीत लावला न जाणारा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदीत 225 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील प्रतिकात्मक राष्ट्रध्वजही आज एकता दिनाचे औचित्य साधून फडकविण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशभक्तीचा सन्मान करतानाच त्यांच्या एकात्म व अखंड भारताच्या विचारांची व मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश प्रसारित करीत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नवी मुंबईकर नागरिकांनीही एकता दिनानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी होत एकात्मतेचे दर्शन घडविले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai