रुग्णालयावरुन राजकीय कलगीतुरा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 04, 2022
- 717
आमदार म्हात्रे आणि नामदेव भगत यांचे आरोप-प्रत्यारोप
नवी मुंबई ः बेलापुर येथे आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजसाठी मंजूर झालेल्या भूखंडावर नवी मुंबईत राजकीय कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख रामचंद्र घरत, विजय घाटे व डॉ. राजेश पाटील यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर या सामाजिक उपक्रमास राजकीय ग्रहण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार मंदा म्हात्रे यांनी सरकारकडे पाठपुरावा करुन सिडकोला बेलापुर विभागात सुपर स्पेशालिटी रुग्णालय व मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी भूखंड सवलतीत उपलब्ध करुन देण्यास भाग पाडले आहे. हे पैसे लवकरात लवकर महापालिकेने सिडकोला देऊन भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिका आयुक्तांकडे लकडा लावला आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी हा भूखंड सिडकोने मोफत द्यावा अशी मागणी करुन या व्यवहारावर दलालीचा आरोप केला. त्यास भाजपचे महामंत्री विजय घाटे यांनी प्रत्युत्तर देत हा व्यवहार दोन शासकीय प्राधिकरणांमधील असल्याने त्यात दलालीचा प्रश्न कुठे आहे असा सवाल भगत यांना विचारला. त्याचबरोबर भगत हे अनेकवर्ष सिडको संचालक होते त्यामुळे दलाली काय असते हे त्यांनाच ठाऊक असा टोलाही त्यांनी लगावला. डॉ. राजेश पाटील यांनी नामदेव भगत सिडको संचालक असताना असे किती भूखंड मोफत महापालिकेला मिळवूून दिले याची यादी देण्याचे आव्हान त्यांनी भगत यांना दिले.
कोरोना संक्रमणात अद्यावत आरोग्य सेवेची गरज सर्वच राजकीय पक्षांना जाणवली असतानाही बेलापुर विभागात मंजुर झालेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय व मेडिकल कॉलेजला विरोध का? असा सवाल नवी मुंबईकरांना पडला आहे. या विरोधामागची कारणे वेगळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून 2024 साली राज्यात होणार्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरोप- प्रत्यारोपांचा फड रंगवत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai