भित्तीचित्र स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2022
- 550
नवी मुंबई ः स्वच्छता कार्यामध्ये नागरिकांच्या कल्पकतेला वाव मिळावा या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील ‘भित्तीचित्र स्पर्धा’ पालिका मुख्यालयाच्या आवारात संपन्न झाली. यामध्ये 69 विद्यार्थी युवकांसह चित्रकार नागरिकांनीही सहभागी होत अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद दिला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेले जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आणि चित्रकार यांनीही यामध्ये सहभाग घेतला.
भित्तीचित्र स्पर्धेकरिता माझे शहर-माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई, 3ठ (ठशर्वीलश, ठर्शीीश, ठशलूलश्रश) हे 3 विषय देण्यात आले होते. महापालिका मुख्यालय आवारातील निश्चित केलेल्या भिंतीवर या स्पर्धकांनी अडीच तासाच्या अवधीत भित्तीचित्र काढले. विशेषत्वाने न.मुं.म.पा. शाळा क्र. 113, शाळा क्र. 117, विद्याभवन स्कूल नेरूळ, न्यू हॉरायजन पब्लिक स्कूल ऐरोली, डॉनबॉस्को स्कूल नेरूळ, आय सी एल स्कूल तुर्भे, ज्ञान विकास हायस्कूल कोपरखैरणे या शाळेतील चित्रकार मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai