7,849 घरांसाठी 20 हजार अर्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 18, 2023
- 405
नवी मुंबई ः दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने काढलेल्या 7,849 घरांच्या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे सिडकोने अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीमध्ये 20 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
उलवे नोडमधील बामण डोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानक परिसरातील घरांसाठी सिडकोने 25 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू केली होती. तसेच अर्ज भरण्याची 22 डिसेंबर ही अंतिम मुदत होती; परंतु अनेकांना अर्ज भरता आले नव्हते. त्यामुळे सिडकोने अर्ज नोंदणीसाठी पहिल्यांदा 6 जानेवारी, तर त्यानंतर पुन्हा 21 जानेवारीपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. या कालावधीत सिडकोच्या या गृहप्रकल्पाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत जवळपास वीस हजार ग्राहकांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली आहे. तसेच या योजनेची संगणकीय सोडत 8 फेब्रुवारी रोजी काढली जाणार आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai