उत्तम पिढी घडविणारा माणूस म्हणून जगायला शिका
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 11, 2023
- 644
तेजाकडून तेजाकडे युवा संवादमध्ये प्रा. प्रवीण दवणे यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : आजच्या युवा पिढी समोर धनापेक्षा मनाच्या प्रश्नांचे फार मोठे आव्हान आहे. परीक्षेच्या काळात फक्त मार्क्स मिळविण्याइतपत घोकंपट्टी करण्यापेक्षा उमजून आणि समजून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असलेला उत्तम पिढी घडविणारा माणूस म्हणून जगायला शिका अशी आर्त साद साहित्यिक, कवि तथा वक्ते प्रा. प्रवीण दवणे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घातली.
दरम्यान, आजच्या युवा पिढीच्या उत्तम भवितव्यासाठी पालकांनी देखील सजग असावे. या वयातच स्वतला ओळखून विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहत आत्मविश्वासाने आणि ध्येयाने येणाऱ्या वादळांना आणि संकटांना तोंड दिले पाहिजे,असे प्रा. प्रवीण दवणे यांनी सांगितले. नवी मुंबईतील महाविद्यालयीन युवकांकरिता स्वामी विवेकानंदांच्या विचारावर आधारित तेजाकडून तेजाकडे अर्थात युवकांचे स्वामी विवेकानंद असा प्रा. प्रवीण दवणे यांनी संकल्पीत केलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे शुक्रवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला, पत्रकार मच्छिंद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. आपण जेथे असतो तेथे मनाने नसतो. परिणामी, आपण सर्व जण विभागले गेलेलो आहोत. त्यासाठी एकाग्रता आणि समग्रता महत्वाची आहे. पूर्वजांच्या संस्कारावर, मातृभूमीवरील मातीवर प्रेम करा. श्रीमंत गाढव होण्यापेक्षा समृध्द माणून म्हणून बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन प्रा. दवणे यांनी यावेळी केले. आजचे विद्यार्थी 21 व्या शतकातील असून त्यांनी गुगल आणि चॅट संस्कृती वेगाने अंगिकारलेली आहे. भविष्यात नक्की आपण काय करायला पाहिजे, याचे योग्य मार्गदर्शन या पिढीला मिळणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा योग्य मार्गदर्शनाअभावी आजची पिढी भरकटण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कर्तत्व असणे पुरेसे नसून त्याला मार्गदर्शनाची जोड असणे महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
दरम्यान, झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रयुगात आज चोहो दिशांनी माहितीचा भडीमार होत आहे. अशा परिस्थितीत ताण-तणावात भरडल्या गेलेल्या तरुण पिढीला वात्सल्यपूर्ण विश्वास देण्याची आवश्यकता भासत आहे. या तरुण पिढीसमोर सकारात्मक विचारांचा आदर्श असणे त्यांच्या पुढच्या सशक्त वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यादृष्टीने आपल्या देशातील महान तत्वज्ञ, विचारवंत, जगविख्यात कुशल वक्ते स्वामी विवेकानंद यांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याचा प्रयत्न नवी मुंबई प्रेस क्लब तर्फे करण्यात आला. या माध्यमातून नवी मुंबईतील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे तेजोमय विचारांचा प्रकाश घेऊन गेल्याचे मनोज जालनावाला यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन साहित्यिक तथा महापालिकेचे जनसंपर्प अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai