पोलिसांसाठी सायबर क्राईम प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2023
- 515
नवी मुंबई : विकसीत झालेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे व्यवहार सोयीचे झाले असताना सायबर गुन्हेगारांचे मात्र फावले आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. परंतु हे गुन्हे उघडकीस आणताना पोलीसांची डोकेदुखी वाढत आहे. अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना सायबर प्रशिक्षण आवश्यक असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकाराने सर्व पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात येत आहे.
भारतीय विद्या भवन यांच्या केएम मुंशी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज तर्फे नवी मुंबई पोलिसांसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण 27 मार्च ते 31 मार्चदरम्यान होणार आहे. डिजिटल फॉरेन्सिक ॲण्ड सायबर क्राईम ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिसांना सायबर क्राईमच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पार पडले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात होणारी वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांसाठी या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. नवी मुंबईतील चाळीस पोलिसांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, यात दोन परिमंडळमधील प्रत्येकी 15 आणि सायबर सेलमधील 10 अशा चाळीसजणांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
सायबर गुन्हेगारांचे अवलोकन केले असता त्यातील बहुतांश गुन्हेगार हे किशोरवयीन आहेत, तसेच अल्प शिक्षित असून भावनिक साद आणि तंत्रज्ञानातील त्रुटी (लूप हॉल) शोधून गुन्हे केले जात आहेत. प्रशिक्षणात मागोवा काढणे आणि गुन्हेगाराचे स्थळ शोधणे यावर जास्त भर देण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबर कक्ष असून, अनेक छोटी प्रकरणे तिथेच सोडवली जातील आणि अत्यंत क्लिष्ट प्रकरणे विशेष सायबर सेलकडे वर्ग केली जातील, अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्य मिलिंद भारंबे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai