घणसोलीत ‘आपला दवाखाना' कार्यान्वित
- by Aajchi Navi Mumbai
- May 01, 2023
- 345
नवी मुंबई ः शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि इतर मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत संपन्न झाला.राज्यभरात आजपासून सुरू होत असलेल्या 317 आपला दवाखान्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कौलआळी, घणसोली येथील आपल्या दवाखान्याचा समावेश आहे.
या दवाखान्यामध्ये एलईडी स्क्रीनवर ऑनलाईन लोकार्पण समारंभाचे थेट प्रक्षेपण प्रदर्शित करण्यात आले होते. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण व डॉ. वैशाली म्हात्रे, डॉ शिवलता सिंग तसेच कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, प्रवीण गाडे, घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय तायडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्त नार्वेकर यांच्याहस्ते घणसोली येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अनौपचारिकरित्या फीत कापून सुरू करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना महापालिका आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सुविधा त्यांच्या कामाच्या वेळेचा विचार करून उपलब्ध करून देण्याचा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. कष्टकरी श्रमिकांना अनेकदा आपल्या कामाच्या वेळेत औषधोपचारासाठी दवाखान्यात जाणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कामाच्या वेळेनंतरही त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून या आपला दवाखानाची वेळ दुपारी 2 पासून रात्री 10 वाजेपर्यंत लोकांना सुविधाजनक अशी दिलासा देणारी असल्याचे ते म्हणाले. आपला दवाखाना अंतर्गत बाह्यरुग्ण सेवा, मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार, टेलीकन्सल्टेशन / मल्टी स्पेशालिटी, गर्भवती मातांची तपासणी, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा अशा विविध 7 प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार सात प्रकारच्या तज्ञ सेवाही उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील टप्प्यात दिवाळेगाव आणि शिरवणे, जुईनगर या ठिकाणीही शहर आरोग्यवर्धिनी केंद्र महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरू होणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai