मुंदडा परिवाराला 500 कोटींची वाढीव नुकसान भरपाई
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 04, 2023
- 1009
नवी मुंबई ः वाघिवली येथील 152 एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी मुंदडा परिवाराने टाकलेला दावा अलिबाग सत्र न्यायालयाने अंशतः मंजुर केला आहे. या मंजुरीमुळे सिडकोला वाढीव भरपाईपोटी मुंदडा परिवाराला 500 कोटी द्यावे लागणार आहेत. या मंजुरीमुळे सदर भूसंपादनापोटी करण्यात येणारे दावे-प्रतिदावे निकाली निघाली असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे.
सिडकोने 2004 मध्ये वाघिवली येथील मुंदडा परिवाराच्या मालकीची 152 एकर जमिन भूसंपादीत केली होती. त्या भूसंपादनापोटी मुंदडा परिवारास रोख रक्कम व्यतिरिक्त साडेबार टक्के भुखंड वाटप योजनेअंतर्गत सीबीडी-बेलापुर येथे 53 हजार 200 चौ. मीटरचा भूखंड वितरीत करण्यात आला होता. या भूखंड वाटपाच्या विरोधात या जमिनीवर कसणाऱ्या कुळांनी आक्षेप घेत सदर मोबदल्यात व भूखंड वाटपात आमचा हक्क डावलला गेल्याचे आरोप वाघिवलीचे उपसरपंच उमेश पाटील यांनी केला होता.
मुंदडा परिवाराने 1971 साली आम्हाला कुळ म्हणून बेकायदेशीर बेदखल केले असल्याचे सांगत कुळ म्हणून आमचे हक्क आजही आबाधित असल्याचे सांगितले. कुळ म्हणून आमचे हक्क जमिन व महसूल कायदाच्या कलम 32(ग) अन्वये जरी आम्हाला बेदखल केले असले तरी वरील कायद्याच्या नियम 32 (प) अन्वये मुंदडा परिवाराचे सदर जमिनीवरील हक्क अबाधित राहण्याची कायदेशीर कारवाई पुर्ण न झाल्याने सदर जमिन शासनाच्या ताब्यात होती असा अहवाल विभागीय कोंकण आयुक्त यांनी सरकारला जुलै 2022 रोजी सादर केला होता. सदर कारवाई पुर्ण न झाल्याने व जमिन शासनाच्या ताब्यात असतानाही सिडकोने मुंदडा परिवाराकडून ताबा घेतला कसा? हा प्रश्नचिन्ह उपसरपंच उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. शासनाने जाहीर केलेले अवॉर्ड हे बेकायदेशीर असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अलिबाग येथील न्यायालयाने मुंदडा यांनी वाढीव नुकसान भरपाईपोटी केलेला दावा अंशतः मान्य केला असून त्यापोटी त्यांना 500 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे मुंदडा भूसंपादन प्रकरणातील आक्षेप निकाली निघाले असल्याची चर्चा नवी मुंबईत असून त्यामुळे मुंदडा परिवारासह विकासक भुपेन शहा यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सध्या बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai